Wednesday, February 20 2019 5:32 am

सायबर गुन्ह्यासंदर्भात सायबर दोस्त !

मुंबई, दि. ४ : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन बाळकृष्ण वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, गुन्हे शाखा , ठाणे शहर यांनी केली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये या विषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबीट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तिला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.