Sunday, March 24 2019 12:15 pm

सांगलीत भाजपची मुसंडी ; काँग्रेस -राष्ट्रवादीची पिछेहाट

सांगली :सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली असून, भाजपनं या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपने 23 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 आणि काँग्रेसनं आठ जागा जिंकल्या आहेत.

सांगली महापालिका निवडणुकीच्या 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात उतरले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सांगलीचा गड राखण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. तर सत्तास्थापनेचा निर्धार भाजपनं केला होता. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निवडणूक कल बघता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपनं अनपेक्षित मुसंडी मारली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीनं 10 आणि काँग्रेसनं आठ जागांवर विजय मिळवला आहे. तसंच भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे.