ठाणे, 07 :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास जिल्ह्यातील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून व देणगी स्विकारून करण्याचे निश्चित झाले आहे.
त्यामुळे या राष्ट्रीय कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.४५ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.)प्रांजळ जाधव यांनी केले आहे.