Monday, June 16 2025 9:09 pm

सर्व घटनांना न्याय देणारा अर्थसंकल्प : आमदार संजय केळकर

ठाणे 01 : पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करणारा व रिकाम्या हाताने काम देणारा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार असून रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणात होणार आहे हा अर्थसंकल्प सर्व घटना न्याय देणारा तर आहेच पण सामान्य लोकांना दिलासा देणार असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी तसेच महिला सक्षमीकरण व ज्येष्ठ नागरिकांना पाठबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. सूक्ष्म व लघु उद्योगानाअनेक सवलती दिल्याने खऱ्या अर्थाने देशाच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे केंद्रीय वित्त् मंत्र्यानी मांडलेला अर्थसंकल्प परिपूर्ण व सर्वांगीण विकास करणारा असून विरोधकांना टीका करायला या अर्थसंकल्पात जागाच जागाच ठेवली नसल्याचेही श्री. केळकर यांनी नमूद केले

या अर्थसंकल्पामुळे सर्व भारतीयांना दिलासा मिळणार असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.