Monday, January 27 2020 10:00 pm

सर्वणांना सरकारने दिलेलं 10 टक्क्यांच्या आरक्षणाचा निर्णय- न्यायालय

नवी दिल्ली-: सर्वणांना सरकारने दिलेलं 10 टक्क्यांच्या आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातही टिकेल. सरकराने त्याची पूर्ण खबरदारी घेतली आहे असं स्पष्टीकरण अरुण जेटली यांनी लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना दिलं. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहेलोत यांनी हे घटनादुरुस्ती विधेयक मांडल्यनंतर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली.सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार किल्ला लढवला.

सुप्रीम कोर्टानं 50 टक्क्यांची मर्यादा ही फक्त नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधल्या आरक्षणासाठी लावली होती. क्षमता असतानाही केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जर एखाद्या व्यक्तिला संधी नाकारली जात असेल तर तो अन्यायच आहे असंही ते म्हणाले.