Monday, May 12 2025 5:52 pm

सर्वंकष स्वच्छता मोहिमेस लोकमान्यनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे 04 : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#DeepCleaningCampaing) आज (02 मार्च) लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. लोकमान्य सावरकर प्रभागसमितीमधील मा. मुख्यमंत्री निवासस्थान, नितिन कंपनी सर्कल येथून या सफाई मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले यांची सफाई करण्यात आली.

या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त अभिजीत बांगर, माजी नगरसेवक एकनाथ कणसे, शरद कणसे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे तसेच महापालिकेचे सर्व उपायुक्त, विभागप्रमुख सहभागी झाले होते.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत रस्ते दुभाजक स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ करणे, पदपथ सफाई, नाले सफाई, उद्यानांची सफाई करण्यात आली. लोकमान्यनगर सावरकरनगर मधील स्थानिक नागरिकांचा या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमान्य सावरकरनगर मधील नितिन कंपनी सर्कल, काजूवाडी साईबाबा सर्कल परिसरातील सिध्दीविनायक चौक ते मैत्री टॉवर, साईनाथ नगर, संतोषी माता चौक, एलआयसी ते साती आसरा संकल्प चौक, जव्हार ज्योत हाजुरी परिसरातील सबेरा हॉटेल, पासपोर्ट ऑफिस, रोड नं. 10, एम.आय.डी.सी, पासपोर्ट ऑफिस ते रोड नं. 10, नितिन कंपनी सर्कल व वैतीवाडी परिसरातील कोरम मॉल, प्रगती हॉस्पीटल, वैतीवाडी गल्ली नं. 2 ते दत्तमंदिर, ज्ञानेश्वर नगर, आईमाता चौक परिसरातील आईमाता सर्कल ते ठाकूर कॉलेज, पाटीलवाडी परिसर, सावरकरनगर परिसरातील मराठा हॉटेल नाला, लोकमान्यनगर टीएमटी डेपो परिसर, सिद्धिविनायक चौक, इंदिरानगर, लोकमान्य टिळक चौक ते वरचा म्हाडा परिसर, वर्तकनगर नाका परिसरातील वर्तकनगर नाका ते देवदया सर्कल, आकृती हब टाऊन रोड, लक्ष्मी पार्क सर्कल येथे शास्त्रीनगर ते हत्ती पुल, कोरस हॉस्प‍िटल परिसर, लोकमान्य मार्केट, इंदिरानगर नाका, लोकमान्यनगर परिसरात साफसफाई करण्यात आली.

तसेच मराठा चौक परिसरातील मराठा हॉटेल ते इंदिरानगर नाका, दालमिल नाका परिसर, जयभवानी शिवसेना शाखा ते रोड नं. 33, दालमिल नाका ते एम्को कंपनी, स्मशानभूमी रेड स्पॉट, तीन हात नाका सर्कल, तानसा पाईपलाईन रोड, पाईप लाईन, दोस्ती रेंटल परिसर, आकृती रेंटल परिसर तसेच दत्तमंदिर नाला ते लाकडी ब्रीज, माताजी मेडिकल मागे लाकडी पूल मार्केट या नाल्यांचीही या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत साफसफाई करण्यात आली.