Tuesday, July 23 2019 2:02 am

सरकारने विहिरी बांधल्या पण त्यातले पाणी कुठे? राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक :  राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सिंचन प्रकल्पांवर खर्च केलेला पैसा गेला कुठे?राज्यातील अनेक गावांमध्ये आजही दुष्काळ आहे.  गावांमधले लोक पाण्यासाठी दरदर फिरत आहेत. मग सरकारने बांधलेल्या विहिरी गेल्या कुठे?? हा प्रश्न राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना विचारला आहे. आज नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.            29 हजार गावांमधील लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार ओरडत फिरते आहे की, राज्यात आम्ही  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इतक्या विहिरी बांधल्या आहेत, तर मग लोकांकडे पिण्यासाठी पाणी का नाही?
       राज्यातील दुष्काळाची परिस्थिती जैसे थे आहे, मग सिंचन प्रकल्पावर खर्च केलेले हजारो कोटी रुपये गेले कुठे? की ते सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच गिळून टाकले??  असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

 “2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही?” असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आणि जर त्यांनी घोटाळा केला होता तर मग आता सत्तेत आल्यावर यांनी का नाही तो प्रश्न सोडवला ?? असे राज ठाकरे यांनी सरकारला विचारले.