Friday, May 24 2019 9:38 am

सरकारचे वचननामे जाळून धनगर समाजाने दाखवली आक्रमकता …..

 

मुंबई : नुकताच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आता धनगर समाज हि आपल्या न्याय हक्कासाठी एकवटला आणि मुलुंड विभागात “यशवंत होळकर” यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी धनगर समाजसाठी असलेल्या वचननाम्याची राख-रांगोळी करीत सरकारला आक्रमित विरोध दर्शिवला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे खासदार पदमश्री नाईक यांनी केले. धनगर समाजाच्या एस टी आरक्षणच्या धनगर जमातींचे सर्व मागण्या प्रलंबित आहेत , २०१४ मध्ये युतीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन  पूर्ण केले नाही आणि मी भाजपचा खासदार असलो तरी आधी मी एक धनगर आहे त्यामुळे मी ह्या आंदोनाचे नेतृत्व करीत आहे, असे खासदार महात्मे यावेळी म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देऊ, पण कधी ? असा प्रश्न उठवित धनगर समाज आक्रमक झाले असून , धनगर समाजाला आरक्षण लागू न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचे धनगर समाजाच्या वतीने ठरवले आहे, असे यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी सांगितले.

“धनगर समाजाचे आरक्षण यामुद्द्यांवर आधारित”-: 

  • बॉंबे रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये ‘धनगर ‘ ऐवजी ‘धनगड’ असा उल्लेख.
  • वर्षानुवर्षे धनगर समाजाचा मेंढीपालनाचा व्यवसाय.
  • नृर्त्य, गायन, देवदेवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती.
  • मानववंश शास्त्रात आणि सामाजिक दृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा दावा.
  • समाजाचा समावेश आदिवासींत का नाही , असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला.
  • बिहार आणि झारखंड मध्ये धनगर समाजाचा समावेश आदिवासी जमातीत.