Tuesday, November 19 2019 3:07 am
ताजी बातमी

सरकारची तिजोरी खाली झाली आहे,त्यामुळे गडकिल्ले विकायला काढलेत; प्रकाश आंबेडकर

मुंबई :- सरकारची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली आहे म्हणून  गडकिल्ले विकायला काढले आहेत. अशी टीका  चित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.   महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादि तयार करून   राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.  सरकारच्या या निर्णयावरून शिव भक्तांमध्ये एकच संतापाचे वातावरण पाहायला मिळाले तर विरोधकांनि टीका करून सरकारवर हल्लाबोल केला आहे.   ३ सप्टेंबर रोजी  राज्य मंत्रीमंडळाडून नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

  सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. त्यांची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता गडकिल्ले विकायला काढले आहेत अशा शब्दात  प्रकाश आंबेडकर यांनी सरकार वर हल्लाबोल केला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे असं विधान केले आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज झाला आहे असं त्यांनी म्हटले आहे.