Thursday, November 21 2019 3:58 am

समतोल फाउंडेशन च्या शेलटर ला पंकजाताई यांची भेट..

ठाणे :विविध राज्यातून घरातून पळून आलेल्या लहान मुलांना समतोल फाउंडेशन ही पुन्हा त्यांच्या घरी जोडण्याचे काम आज अनेक वर्षे करीत आहे. घरातून पळून आल्यावर रेल्वे फलाटालाच  आपलं घर समजणाऱ्या मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाशी जोडणारी ही संस्था आहे. समतोल फांऊडेशन कार्याचा सन्मान हा नेहमीच होतो परंतु आज एका भेटीने सर्वाच्या मनात आनंदोत्सव होत होता. आदरणीय सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पंकजा ताई मुंडे व अमितजी पालवे यांनी व आदरणीय जनसेवक, आमदार व समतोल चे विश्वस्थ मार्गदर्शक श्री. संजय जी केळकर, आमदार श्री. प्रताप जी सरनाईक, खासदार श्री. राजन जी विचारे श्री. संदिप जी लेले या सर्वाची उपस्थिति होती. पंकजा ताईंनी मुलांबरोबर गप्पा मारल्या त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. समतोलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आज असे वाटले की लोकप्रतिनिधि यांचा ठाणे जिल्हा मधील सामाजिक समतोल संस्थेने साधला.  आ. संजय केळकर नेहमीच या सर्वासाठी पुढाकार घेत असतात.  समतोल चे प्रमुख म्हणुन संजय केळकर हा विषय मार्गी लावतात. खुले निवारागृह ही संकल्पना प्रत्यक्ष राबवता असे कौतुक ताईंनी समतोल चे केले. बाल हक्क सरंक्षण आयोगाचे सदस्य प्रत्यक्ष कामे करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.

समतोल फाउंडेशन च्या शेलटर ला पंकजाताई यांची भेट घेतली त्यावेळी आमदार संजय केळकर खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक आदि मान्यवर उपस्थित होते