Tuesday, June 2 2020 4:45 am

सभागृहातील सदस्यांनी एकमेकांना समजून घेऊन काम केले तर काम खूप सोपे होईल. – सुमित्रा महाजन

नवी-दिल्ली -: गेल्या काही काळापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गोंधळामुळे वारंवार तहकूब करावे लागत आहे. सातत्याने कामकाजात व्यत्यय येत असल्याने लोकसभा सभापतींनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली आहे. परंतु, गुरुवारी लोकसभेतील कामकाजाचा नूर एकदमच पालटलेला दिसला. हा लक्षणीय बदल बघून सभापती सुमित्रा महाजन यांनीही सदस्यांच्या या रुपाचे कौतुक तर केलेच त्याचबरोबर कानपिचक्याही दिल्या.सुमित्रा महाजन म्हणाल्या, “सभागृहातील सदस्यांनी एकमेकांना समजून घेऊन काम केले तर काम खूप सोपे होईल.

” दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत संसदेत गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणतात, अशा पूर्वानुभवाने महाजन यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. लोकसभेत निर्माण होत असलेले द्वेषमुलक वातावरण लोकशाही व्यवस्थेत योग्य नाही, असेही त्यांनी अनेकदा म्हटले होते. लोकसभेत गुरूवारी माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन संबंधीच्या पुरवणी मागण्यांवर बोलत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ए संपत यांनी प्रश्नोत्तराच्या काळात याबात प्रश्न विचारला होता. तेव्हा संपत म्हणाले की, मी प्रश्न ‘दिल से’ विचारत आहे. यावर उत्तर देताना राठोडही म्हणाले की, मी ही ‘दिल से’ उत्तर देतो.