Tuesday, June 2 2020 3:35 am

सत्तेच्या हव्यास आणि आश्वासनांची देणगी

 नांदेड :-   सत्ता हातात यावी म्हणून कोण काय करेल हे सांगता येत नाही, मनाला वाटेल ते आश्वासन देऊन सध्या राजकारणी मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. असच काहीसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत झालं. “तुम्ही मला सत्तेत आणा मी तुमच्या जुन्या नोटा बदलून देतो”, असे त्यांनी आपल्या मतदारांना सांगितले आहे. नांदेड येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी ते बोलत होते.
           मोदी सरकारने नोटबंदी केली तेव्हा अनेक जणांना नोटा बदलून घेताना त्रास झाला. काही लोकांकडे अजूनही जुन्या नोटा तश्याच पडून आहेत. त्यात व्यापारी आणि मोठमोठे उद्योजक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे व्यापारी लोकांचे खूप नुकसान झाले तसेच मोदी सरकारविरोधात मनात असंतोष वाढतच आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर   करत आहेत. “व्यापारी मित्रांनी काळजी करू नका, तुमचे अडकलेले पैसे मी सोडवून देतो. येत्या निवडणुकीत सत्ता माझ्या हातात द्या, तुमच्या सर्व नोटा मी बदलून देईल” , अस आश्वासन त्यांनी दिले.
         यावेळी बोलताना ते म्हणाले , ” मोदी सरकारने लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू केली आहे.” “व्यापाऱ्यांना धमकावण्यात आलेले आहे आणि जबरदस्तीच्या मार्गाने त्यांच्याकडून स्वतःचा प्रचार करत आहेत.” असा आरोप देखील आंबेडकरांनीं केला आहे.