Saturday, June 14 2025 5:29 pm

संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीचा उडाला धुराळा

ठाणे, 18 : ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस ठाण्यातील बाजारपेठूतन झाला. सुरवातीला त्यांनी शक्तीस्थळावर जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाला नतमस्तक होत या प्रचार रॅलीला सुरवात केली. या प्रचार रॅलीत महायुतीमधील घटक पक्षही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागील काही दिवसापासून संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीचा धडाका सुरु आहे. मागील १५ दिवस मॉर्निंग वॉक, प्रचार रॅली, बाईक रॅली, चौक सभा आणि महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरु आहे. त्यात आता सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी देखील त्यांनी हा दिवस सार्थकी लावल्याचे दिसून आले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शक्ती स्थळावर जाऊन ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झाले. त्यानंतर खारकर आळी, जांभळी नाका ते ठाणे स्टेशन असा मार्केटमधून त्यांची प्रचार रॅली फिरली. तर या प्रचार रॅलीचा समारोप स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून समारोप करण्यात आला. दरम्यान या प्रचार रॅलीत या भागातील व्यापाºयांनी फटाके वाजवून, हार तुरे घालून केळकर यांचे जोरदार स्वागत केले. तसेच येथील नागरीकांनी स्वत: पुढे येऊन या रॅलीत आपला सहभाग नोंदविला. तर या रॅलीच्या निमित्ताने केळकर यांनी स्टेशन भागातील कुंज विहार या हॉटलमध्ये चहा आणि वड्याचा आस्वाद घेतला.
या प्रचार रॅलीत शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक पवन कदम, नम्रता कोळी, पल्लवी कदम, सुधीर कोकाटे, जयंद्र कोळी, सुनील हंडोरे, निलेश कोळी, निखिल बुलझडे, संजय पाटील, मितेश शाह, किशोर सोनगडा, विशाल वाघ तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.