Monday, June 17 2019 4:13 am

संक्रांत १५ जानेवारीलाच

ठाणे-:  १४ जानेवारीला की १५ जानेवारीला, यावरून संभ्रम असतो. २०१२ मध्ये १५ जानेवारीला सूर्यानं मकर राशीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्या वर्षी १४ जानेवारीऐवजी १५ जानेवारीला मकर संक्रांत साजरी करण्यात आली होती. त्यानंतरही याच दिवशी संक्रांत साजरी झालीय आणि यंदाही ती १५ तारखेलाच साजरी करावी, असं अभ्यासकांनी सांगितलं. वास्तविक, सूर्य ज्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ती मकर संक्रांत असते. यंदा हे संक्रमण १५ तारखेला होणार आहे.

मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. या दिवसापासून दिनमान मोठं होण्यास सुरुवात होते. म्हणजेच, अंधार कमी होऊन आणि प्रकाशाचं पर्व सुरू होतं. या दिवशी आपण तीळगूळ वाटून स्नेह वृद्धिंगत करतो, गोडवा पसरवतो, आकाशात पतंग उडवून आनंद साजरा करतो, असा दिवस अशुभ असूच शकत नाही, असं दा. कृ. सोमण यांनी अगदी ठामपणे सांगितलं. संक्रांत येणं हा वाक्प्रचार कुठून आला ठाऊक नाही, पण संक्रांत या सणाचा आणि वाईटाचा किंवा संकटाचा काहीच संबंध नाही, असं ते म्हणाले. संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. या काळ्या रंगामुळेही काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. पण, मुळात काळा रंग काही अशुभ नाही आणि संक्रांतीला हा रंग वापरण्यामागचं कारण वातावरणाची संबंधित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.