Saturday, August 24 2019 11:07 pm

संकटात सुद्धा निवडणुकांचा विचार येतो तरी कसा?;उद्धव ठाकरे

मुंबई  : महाराष्ट्रात आलेल्या संकटात देखील निवडणुकीचा विचार येतो तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित करत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र असलेल्या पूरपरिस्थितीत आपण  बांधवांसाठी  पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन  उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

   कोल्हापूर-सांगलीतील  पूरस्थिती लक्षात घेता दोन तीन दिवसात हि परिस्थिती नियंत्रणात येणार नाही अशा परिस्थिती मध्ये राज्यात कोणत्याही निवडणुका घेणं माणुसकीला धरून होणार नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलावी,’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.  
आज दुपारी शिवसाहित्य मदतीचे ट्रक , अॅम्बुलेंस शिवाजी पार्क, दादर येथून सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशी मदत शिवसेनेतर्फे करण्यात आली. अशी माहिती   शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत उद्धव यांनी दिली
यावेळी त्यांना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता त्यांनी ‘त्याविषयी आता काही बोलण्याची वेळ नाही,’ असे म्हणत उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, ‘मला राजकारणात पडायचे नाही. जे जे आवश्यक आहे, ते करणं मला महत्त्वाचं वाटतं. आधी ज्यांची घरे वाहून गेली आहेत. त्यांना मदत करणं गरजेचे आहे.’
‘वातावरण बदल होतोय. मुंबईतही महिनाभराचा पाऊस एका दिवसात पडला. याविषयीचा विचार, त्यावर मात करणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी तज्ञ्जांनी विचार करायला हवा,’ असं मतही उद्धव यांनी व्यक्त केलं. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.