Monday, January 27 2020 2:39 pm

श्रीलंकेचा करुणारत्नेच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो जमिनीवर कोसळला

श्रीलंका -: ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 534 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करुणारत्ने व लाहिरू थिरीमाने यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावा जोडल्या, परंतु 32 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर थिरीमाने बाद झाला. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला मोठा धक्का बसला. करुणारत्नेच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो जमिनीवर आडवाच झाला.
त्याच्या मदतीला वैदकीय अधिकारी धावले, परंतु हे प्रकरण गंभीर असल्याचे कळताच त्यांनी स्ट्रेचर मागवला. करुणारत्नेला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आल्याने श्रीलंकेसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचाही काळजाचा ठोका चुकला आहे. करुणारत्नेच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याने सर्वांची चिंता अधिक वाढली आहे.