ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटना तसेच प्रसार व प्रचारासाठी व पक्षाची मजबूत मुट बांधण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पदावर कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली असून सर्वसामान्यांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेनुसार ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमाणिक सक्रिय युवा कार्यकर्ते श्रवण भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा सरचिटणीस पदी निवड झाली आहे तसेच नियुक्तीपत्र ठाणे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार दिले आहे. श्रवण भोसले हे पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते असून निवडणुका ,संप ,आंदोलने ,बैठका विविध पक्षांची कामे आधी पक्षाच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. गोरगरीब लोकांच्या समस्यांची जाणीव असलेले व तळागाळात काम करणाऱ्या तरुणांची पक्षांनी दखल घेतली असून त्याच्या कार्याची पोचपावती म्हणून ठाण्यामधील श्रवण भोसले यांची नेमणूक पक्षाने कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्र सरचिटणीसपदी केली आहे .त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .आदरणीय अध्यक्ष श्री शरद पवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व तसेच ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे व जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत व अधिक सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त करत श्रवण भोसले यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले आहे.