ठाणे, 10:- येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 च्या आंबिया बहाराकरीता योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमा पोर्टल सुरु झाले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी निर्धारीत केलेल्या कालावधीत योजनेमध्ये सहभागी होऊन कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्टये :
· कोकण विभागामध्ये अधिसूचीत केलेल्या महसूल मंडळात केळी, आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू – 5 वर्षे)
· कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.
· खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील.
· एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.
· विमा अर्ज सोबत फळबागेचा जीओ टॅगिंग (geo tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
· एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.
· ही योजना ठाणे जिल्हामध्ये एचडीएफसी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत; पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व रायगड जिल्हामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लि. मार्फत राबविण्यात येत आहे.
· शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीवर फळपीकाची नोंद करणे बंधनकारक आहे.
· फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरीता दि. 31 ऑक्टोबर 2024 तर काजू व आंबा पिकाकरीता दि. 30 नोव्हेंबर 2024 आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./हेक्टर) :
ठाणे जिल्हा:-
आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 17 हजार.
काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.
केळी फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-8 हजार 500.
पालघर जिल्हा –
आंबा फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-21 हजार250.
काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.
केळी फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500.
रायगड जिल्हा-
आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-14 हजार 450.
काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.
रत्नागिरी जिल्हा –
आंबा फळपिक-विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 13 हजार 600.
काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.
सिंधुदुर्ग जिल्हा –
आंबा फळपिक-विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500.
काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.
केळी फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500.