Thursday, December 5 2024 5:28 am

शुक्रवारी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे नवीन शिक्षण धोरणावर राष्ट्रीय परिषद

ठाणे, 22- केंद्र सरकारन नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. 30 जून) ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ . गणेश भगुरे यांनी दिली.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अद्यापही संदीग्धता आहे. हे धोरण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच, शिक्षण संस्था, शिक्षक यांना हे धोरण राबविण्यात अग्रेसर असणार आहेत. या सर्व घटकांना मार्गदर्शन आणि या धोरणाबाबतची माहिती सुस्पष्ट होण्याच्या दृष्टीकोनातून ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. नॅक, आयसीएसएसआर आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत नवीन शिक्षण धोरणाची आखणी करणारे शिक्षण तज्ञ सहभागी होणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱहे, शिक्षण सचिव रस्तोगी, कुलगुरु डाॅ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु डाॅ. अजय भामरे आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या परिषदेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे सहसेक्रेटरी डॉ. मंजू सिंह, एसएनडीटीच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मा. खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. नितीन करमळकर , डॉ. शोभना वासुदेवन, डॉ. अभय पेठे, डॉ. सरीत अग्रवाल, प्रसाद प्रधान, डॉ. देवेंदर कावडे आदी शिक्षणतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला देशभरातील प्राचार्य, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. भगुरे यांनी केले आहे