Monday, June 1 2020 2:32 pm

शिवसैनिकांच्या गाड्या मातोश्रीवर पोहचण्या आधीचा अडवण्यात आल्या

 नवी मुंबई :- शिवसेना खासदार रवी गायकवाड यांना तिकीट न दिल्याने संताप झालेल्या त्यांच्या समर्थकांनी शनिवारी रात्री थेट दादर मधील मातोश्री कडे रवाना झाले. खासदार रवी गायकवाड यांना तिकीट दिले नाही म्हणून समर्थकांनी आंदोलन कडत मातोश्री वर निशाणा साधला. हि माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर समर्थक मातोश्री वर पोहोचण्या आधीच नवी मुंबई पोलीसांनी वाशी टोलनाक्यावर समर्थकांच्या गाड्या अडवण्यात आल्या व काही शिवसैनिकांना रविवारी सकाळी ताब्यात घेतले.  उर्वरित शिवसैनिक टोलनाक्यावर बस अडवल्यानंतर रेल्वेने शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहेत.

खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. या मेळाव्यात पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. आज गायकवाड यांचे समर्थक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.त्यामुळे आज मोतोश्री वर काय घडणार आहे या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. काल गायकवाड समर्थकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी उमरग्यात मेळावा घेतला. यावेळी गायकवाड यांच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा भोसले नावाच्या समर्थकानं ‘तिकिट पाहिजेच’ असा घोष करत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी या समर्थकास तातडीनं रोखलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी मेळाव्याच्या ठिकाणी जमलेल्या काही इतर कार्यकर्त्यांकडूनही चार ते पाच रॉकेलच्या बाटल्या जप्त केल्या.