Monday, April 6 2020 3:06 pm

शिवसैनिकांकढुन ज्येष्ठ नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिक अधिक काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या संवेदनशील गटातील व्यक्तींच्या प्रतिकार शक्तीत बदल होत असतो. शिवाय, शरीरातील बदल, अन्य आजारपण व वातावरणातील बदलांचा परिणाम या संवेदनशील गटातील व्यक्तींवर अन्य घटकांपेक्षा लवकर होतो. त्यामुळे कोरोना व अन्य संसर्ग टाळण्यासाठी संवेदनशील घटकांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.म्हणून ठाण्यातील शिवसैनिकांनी ज्येष्ठ नागरिकांना मास्क आणि सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले आहे . ठाणे शहरामध्ये कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव जाणवला नसला तरी ठाणे शहरामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे . या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी चे विभागप्रमुख गिरीश राजे यांनी इतर कार्यकर्त्यांसोबत ज्येष्ठ नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप केले. कोपरी परिसरातील अष्टविनायक चौक, कोपरी गाव , साईनाथ नगर ,चेंदणी कोळीवाडा , नारायण कोळी चौक , ठाणे पूर्व स्थानक येथे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त वावर होत असतो.त्यामुळे त्यांना कोरोनासारख्या विषाणूचा त्रास होण्याची शक्यता असते.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप केले आहे आणि हि मोहीम अखंडितपणे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख गिरीश राजे यांनी सांगितले .याप्रसंगी माजी नगरसेवक कृष्णकुमार कोळी ,गणेश मुकादम , अजित पेडणेकर , अजय नाईक , सुभाष परब , दिपक दांडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.