Tuesday, June 2 2020 2:54 am

शिवसेनेला मोठा फटका; कल्याणमध्ये २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा

ठाणे : विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच कल्याणमध्ये शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सर्वात मोठा फटका बसला आहे. भाजप सेना जागावाटपा वरून नगरसेवक व कार्यकर्ते नाराज असल्याचे समजत आहे.
२६ नगरसेवक व ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी राजीमाना दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका बसला असून या सर्वांनी स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे राजीनामे दिले आहेत. कल्याण विधानसभा निवडणुकीची उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु जागावाटपा मुळे हि जागा भाजप कडे गेल्याने नगरसेवक व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.