Monday, April 21 2025 10:18 am
latest

शिवसेनेतर्फे एस.एस.सी सराव परीक्षेचे आयोजन

ठाणे, 19 : दहावी अर्थात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती जावून त्यांचा आत्मविश्वास वाढावा व पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी एस.एस.सी बोर्डाच्या पध्दतीने सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्यावतीने घेतली जाते. धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी या सराव परीक्षा सुरू केल्या त्या आजतागायत एकही वर्षे खंड न पडता विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या संयोजनाखाली सुरू आहे. यंदाच्या या परीक्षेचे 33 वे वर्ष असून दिनांक 14/01/2024, 21/01/2024 व 28/1/2024 या दिवशी या सराव परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

ठाण्यात कळवा, मुंब्रा, कोपरी ठाणे पूर्व, किसननगर, पडवळनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर, काजूवाडी, मानपाडा, दिवा, ज्ञानेश्वरनगर, मीराभाईंदर, जव्हार, वाडा व ठाणे शहरात चार अशा 30 परीक्षा केंद्रावार या परीक्षेत होणार आहेत. तरी या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद केंद्रावरील शिवसेना शाखांमध्ये संपर्क साधावा.

दिनांक 14/01/2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठी, दुपारी 3 ते 5 या वेळेत विज्ञान 1, दिनांक 21/01/2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वैळेत इंग्रजी, दुपारी 3 ते 5 या वेळेत विज्ञान 2, 28/01/2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत बीजगणित -1, दुपारी 2 ते 4 या वेळेत गणित -2 हे पेपर होणार आहेत. या परीक्षा मराठी माध्यम, सेमी इंग्रजी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीही घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 04 जानेवारी 2024 अशी आहे.

अधिक माहितीसाठी 9819875567/ 7977515661 या क्रमांकावर किंवा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, डॉ. मुस रोड, तलावपाळी, ठाणे येथे संपर्क साधावा. तसेच या ठिकाणी प्रवेश अर्ज दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत स्वीकारण्यात येतील.