Tuesday, July 23 2019 11:16 am

शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे आणि ठाकरेच ….

मुंबई – आपल्या वैयक्तिक लोकप्रियतेसाठी  स्वत:चेच  फोटो बॅनरवर लावणारे  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली आहे. बॅनरवरील फोटोवरुन शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा होणारा वाद टाळण्यासाठी शिवसेनेने स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरण्यास बंदी घातली आहे. शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक ‘मातोश्री’ पार पडली. या बैठकीत आचारसंहिता जारी केली. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या कार्यक्रमाचे किंवा एखाद्या सूचनेचे बॅनर लावताना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद होत होते म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.