Monday, June 1 2020 1:31 pm

‘शिवसेना को पटक देंगे’, मात्र तरीही उद्धव ठाकरे नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

रायगड-: सध्या शिवसेना-भाजपमध्ये भांडणं आहेत. लातूरच्या सभेत अमित शाह म्हणाले होते की ‘शिवसेना को पटक देंगे’, मात्र तरीही उद्धव ठाकरे नाक घासत मुख्यमंत्र्यांना सांताक्रुझच्या सॉफिटल हॉटेलमध्ये भेटायला गेले, अशी घणाघाती टीका त्यांनी उद्धव यांच्यावर केली आहे. आजपासून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला रायगडमधून सुरूवात झाली आहे. या सभेत बोलताना यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे.

आजपासून सरकारविरोधात राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा सुरू होतं आहे. त्याचा प्रारंभ राष्ट्रवादीने रायगडावर शिवाजी महाराजांना अभिवादन करून केला आहे.दरम्यान, रायगडावर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते.