Thursday, December 12 2024 7:44 pm

शिवसेना आमदार श्री रविंद्र फाटक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम आमदार निधीतून नितीन कं जंक्शन येथिल एकता रिक्षा स्टॅन्ड जवळ बनविण्यात आलेल्या

विश्रांती कट्ट्याचे लोकार्पण व ठा.म.पा. मुख्यालयासमोरील कचराळी तलावावरील कै.निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यान मुख्य प्रवेशद्वाराचे केलेले नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे उदघाटन आज ठाणे लोकसभेचे खासदार श्री राजनजी विचारे यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी ठाणे विधानसभा शहर प्रमुख श्री. हेमंतजी पवार, माजी उपमहापौर सौ पल्लवी कदम, मा.नगरसेविका सौ नंदिनी विचारे, सौ रुचिता मोरे, श्री. राजेश मोरे, श्री राजाभाऊ गवारी,श्री. मंदार विचारे, श्री संजय सोनार,विधानसभा उपशहरप्रमुख श्री राजू गजमल,विभागप्रमुख श्री राम काळे,एकता रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष श्री विनायक सुर्वे, स्टँड अध्यक्ष श्री परशुराम घोंगे आदी मान्यवरांसहित स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.