ठाणे 11 – शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे, व्यंगचित्रकला टिकण्यासाठी, व्यंगचित्रकार घडविण्यासाठी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती प्रित्यर्थ स्पर्धा व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांची २०२३ आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे ७ वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी बालव्यंगचित्रकार वय वर्ष १५ खालील,हौशी व्यंगचित्रकार – खुला गट वय वर्ष १६ वरील परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत असेल.
“व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ४२ X ३० सेंमी ) पेपर मध्ये, तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख/वय , मोबाईल नंबर, आपला पूर्ण पत्ता व बालव्यंगचित्रकारांनी आपल्या शाळेचं नाव लिहून धर्मवीर आनंद दिघे चौक , मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे आज पासून दि. २० जानेवारी २०२३पर्यंत सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वा ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, तसेच, एकदा पाठवलेली व्यंगचित्र ही पुन्हा परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी ९८३३१५८८००/९२२४१९९९७९/९७६८६८८२९७/९८६९४१३९११ येथे संपर्क करावा असे आपल्या प्रसिध्द पत्रकात अध्यक्ष अजय नाईक यांनी म्हटले आहे.