Saturday, September 18 2021 1:16 pm
ताजी बातमी

शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर अटक

नाशिक: लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकरला एसीबीने अटक केली आहे. वैशाली झनकरला आठ लाखांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत झनकर फरार होती. कल्याण आणि नाशिक जिल्ह्यात झनकरकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. झनकरच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले बहुतेक सर्व निर्णय संशयाच्या भोव-यात आहेत.

सर्व प्रकरणांची चौकसी करण्याची मागणी केली जाते आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – ठाणे येथील एका शिक्षण संस्थेकडून आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी वीर यांच्यासह शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर जनकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीये. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत फरार झालेल्या या शिक्षणाधिकारी आठ लाख रुपये लाच घेताना त्यांच्या ड्रायव्हर आणि एका शिक्षकासह छाप्यात रंगेहाथ सापडलयायेत. त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड, सिन्नर नाशिक गंधारे आणि गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट आहेत.

कल्याणमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने लाचलुचपत विभागाने त्यांच्याबद्दल काही तक्रारी असल्यास नागरिकांना आवाहन आवाहन केले आहे…!