Thursday, December 12 2024 7:30 pm

शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

नवी मुंबई, 20 :- विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, संबधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारिरीक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID), अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.