Tuesday, June 2 2020 4:20 am

शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारातून २३ मुलांना विषबाधा

पुणे :  पोषण आहाराच्या भातातून  २३ विद्यार्थ्यांना  विषबाधाझाल्याची घटना कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेत घडली आहे.  ही सर्व मुळे इयत्ता आठवीत शिकत असून या मुलांना नेहमी प्रमाणे पोषण आहाराचा भात देण्यात आला. त्यानंतर या मुलांना उलट्या सुरू झाल्या. विषबाधाझाल्या विद्यार्थ्यांना   तत्काळ  उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केले आहेत. अशी  माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनी दिली.      यांपैकी   ४ मुले अवस्था गंभीर असून  अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

किरकोले यांनीही हा भात खाल्ला. त्यानंतर त्यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९ मुलांची प्रकृची चांगली असून ४ मुलं अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.