Tuesday, July 23 2019 2:31 am

शाळेच्या दुरुतीसाठी मनसेचे भजन आंदोलन

ठाणे : दिवा -दातवली येथील ठाणे महापालिका शाळा क्र ९४ शाळेच्या अत्यंत दुरवस्थेमुळे दुरुस्तीच्या नावाखाली  शाळा मंदिरात भरवण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर  टाळ-मृदुंगाचा गजर करत भजन करून अनोख्या पालिका शिक्षण मंडळाचा निषेध नोंदवित अभिनव पद्धतीने आंदोलन  केले.

              दातवली येथील ठाणे महापालिका शाळा क्र ९४ या शाळेची अत्यंत दुरा वस्था झाली असून गेल्या वर्षभरापासून बालवाडीचा वर्ग हा दुरुस्तीच्या कारणास्तव नजिकच्या हनुमान मंदिरात भरवण्यात येत आहे.परंतु मंदिर असुरक्षित असल्याने   मुलांच्या तसेच शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.   लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करून पुन्हा शाळेत वर्ग भरवावेत यासाठी ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे ठाणे शहर अध्यक्ष अरुण_घोसाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घंटाळी येथील ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंगाचा गजर करत भजन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दिनेश मांडवकर, प्रितेश मोरे, अंकिता सारंग, कुशल पाटील, अर्पित पोळ, भूषण केंबरी, हर्षल फणसे, आदेश पाटेकर, ओमकार महाडिक, रोशन वाडकर,नितेश जाधव, सागर कदम, जितेश रायकर, आकाश चौधरी, प्रथमेश काजरी, अजिंक्य चव्हाण, विकास मोरे, सुरेश डुनगिकर, अजिंक्य जोशी,  विशाल साळुंखे, प्रशांत पार्टे, निलेश देवरूखकर आदी सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

          ठाणे महापालिकेचा बजेट ३६०० कोटींचा असताना महापालिकेची शाळा दुरुस्ती होत नसल्याने मंदिरात भरवावी लागत असल्याने हि महापालिकेसाठी शरमेची बाब  आहे. जर लवकरात लवकर शाळा दुरुस्त करून शाळा सुरू केली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनविसे ठाणे शहराध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी दिला.