ठाणे 16- शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी पंढरी ठाकरे याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता डोळखांब येथे कसाराकडे जाणाऱ्या मार्गावर मिळालेल्या माहितीनुसार किन्हवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, स.पो.नि. एस. आव्हाड व पोलिस शिपाई म्हस्के, पारधी, वाघमारे, जाधव, गिरगावकर, खांदवे यांनी सापळा रचून छोटा चारचाकी वाहनातून ८ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह वाहन जप्त केले गेले आहे. तंबाखूजन्य गुटखा विक्रीस शासनाने बंदी घालूनही शहापूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकान, पानटपऱ्या तसेच इतर दुकानांत मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.