Thursday, November 21 2019 3:42 am

शहापुर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा करणार शिवसेनेत प्रवेश

ठाणे – विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास नक्की झालं आहे.
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून पाहिले जात होते. कारण, १९८० पासून बरोरा कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. परंतु, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची होत असलेली पिछेहट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच बरोरा यांचा मातोश्रीवर जाऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश होणार आहे. दरम्यान, आगामी ३ ते ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.
दरम्यान ठाण्याचे पालकमंत्री असलेले आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःची गट तयार करत असून, त्यासाठी ते जास्तीत जास्त आमदार स्वतःच्या गोटात सामील करत असल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या या लॉबी राजकारणाची चर्चा अनेक राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवली आहे.