Tuesday, July 7 2020 1:27 am

शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात

नवी मुंबई :- कार्ला तेथून एकविरा देवेचे दर्शन घेऊन परत येताना  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे.  अपघातग्रस्त गाड्यांमध्ये राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कारचाही समावेश आहे.    नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक ऑटो रिक्षा अचानक शर्मिला यांच्या कारच्या समोर आली. तिला धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरना कारचा ब्रेक लावला. त्याचवेळी दुसऱ्या गाडीनं शर्मिला यांच्या कारला धडक दिली. राज ठाकरे यांची कार त्यावेळी पुढं निघून गेली होती. अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे तर, चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकी साठी येत्या  ९ तारखेपासून राज हे महाराष्ट्रभर प्रचाराला सुरुवात करणार असून आपल्या सभा ठिकठिकाणी घेणार आहेत