Friday, January 17 2020 7:48 pm

शरद पवार २०२२ मध्यले राष्ट्रपती – शिवसेनेते नेते खा.संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील  विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका वठवलेले शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याच्या कामाला लागले आहेत. सन २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा विचार करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. २०२० साली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल असा दावाही राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.