Friday, May 24 2019 6:21 am

शरद पवार यांना अजित पवारांनीच लावला ईव्हीएमबाबत अप्रत्यक्ष टोला

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजित पवारांनीच ईव्हीएमबाबत अप्रत्यक्ष पणे टोला लावला आहे. अजित पवार म्हणाले, ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नाही. इतकंच नाही, तर ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजप पाच राज्यांमध्ये हरली नसती, असंही अजित पवार म्हणाले.

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेलं नसतं. पण काहींच्या मनात शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे, असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांनाच अप्रत्यक्षरिता टोला लगावला.
शरद पवार म्हणाले होते की,
जर भाजपने बारामतीची जागा जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत केलं होतं. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने ईव्हीएमशी छेडछाड करण्याचं काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं होतं.

दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या नेत्यांची बैठक पार पडली. कार्यक्रमानंतर बोलताना अजित यांनी भाजप सरकार हे ‘अटीचे सरकार’ असल्याची टीका केली. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट, प्रवेशाला अट, यातून कोणाचंही भलं होणार नाही, असं अजित पवार म्हणाले.