Tuesday, July 7 2020 12:58 am

शरद पवार उद्या घेणार सोनिया गांधी यांची भेट

मुंबई :- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन देखील अजून राज्यात सत्ता स्थापन होत नाही त्यातच काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी होत आहेत. शरद पवार यांनी आज, शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर शरद पवार उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची पुढची भूमिका स्पष्ट व्हायची शक्मयता आहे.आजच्या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, तटकरे आणि धनंजय मेंडे उपस्थित आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला अडीच वर्ष नव्हे तर पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी आहे, असं सूचक वक्तव्य केलं आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत दोन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट होईल.