मुंब्रा कळवा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांची पोलीस उपायुक्तांकडे मागणी
ठाणे, 15 -शमीम खान यांनी केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोपाची चौकशी करण्याची मागणी १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे एक निवेदन देऊन केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा कळवा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी बुधवारी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत शमीम खान यांनी माझ्यावर अनेक बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले. यात, ‘नजीब मुल्ला मुझे दुबईसे फोन करवाता है, मुझे ईडी की धमकी देता है, तसेच मेरे साथ कोई हादसा होता है या मुझे मार दिया जाता है तो इसका जिम्मेदार नजीब मुल्ला होगा’ अशाप्रकारचे जाहीर वक्तव्य शमीम खान यांनी माध्यमांसमोर बोलताना केले. शमीम खान यांनी मुंब्रा कळवा परिसरातील मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने माझ्यावर बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले असल्याची माझी तक्रार आहे.सदरचे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि शमीम खान यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने शमीम खान यांना आलेले फोन काॅल्स तसेच त्यांचे सर्व काॅल डिटेल्स तपासून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे पुरावा म्हणून नजीब मुल्ला यांनी निवेदनासोबत शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ रेकॉर्डींग असलेला पेन ड्राईव्ह पोलीस उपायुक्त यांना सादर केला आहे.