Tuesday, November 19 2019 3:12 am
ताजी बातमी

व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा

शिर्डी – साईंच्या दरबारात पुन्हा एकदा साईबाबांचा चेहरा दिसल्याने हजारो साई भक्तांनी साई बाबांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. शिर्डी मध्ये साई भक्तांनी साईंच्या दर्शन घेत साईनामाचा गजर सूरू आहे.
शिर्डी माझे पंढरपूर असे म्हणत आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला.
याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी व भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत होते.
अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भावीकांनी एकच गर्दी केली होती.दरम्यान यापूर्वीही ६ जानेवारी २०१२ ला व्दारकामाईत दिसले होते. त्यानंतर १२ एप्रिल २०१८ ला दिसले होते. मात्र यावेळी बाबांचा चेहरा थोडा अस्पष्ट दिसत आहे.