Saturday, January 25 2025 8:27 am
latest

वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार

मुंबई, 06 : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. अर्ज सादर करण्याची मुदत 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. या मुदतीअंती 22 हजार 981 बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 283 रिक्त पदे भरावयाची आहेत. ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.