Tuesday, November 19 2019 4:13 am
ताजी बातमी

वेळ आली बाप्पाचा निरोप घेण्याची

मुंबई:- दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पुजा अर्चना केल्या नंतर आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली. आज अनंत चतुर्दशी निमित्ताने बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार असून मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळणार आहे. विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी पोलिस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.मुंबईत १२९ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार असून, पालिकेच्या वतीने ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० हजार पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहनचालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये, तसेच पोलिस, जीवरक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.