Monday, April 6 2020 1:35 pm

वृत्तपत्र विक्रीही ३१ मार्च पर्यंत बंद ! मुंबई -ठाणे आवृत्यांची छपाई बंद होण्याची शक्यता

कल्याण : कोरोना बाबतचे तपशिलवार माहिती मिळण्याचे एकमेव साधन असलेले वृत्त पत्रे ही आता ३१ मार्च पर्यत मिळणार नसल्याने वृत्त पत्र वाचकांचीही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. माहितीचे सर्वात मोठे आणि खात्रीचे साधन म्हणून बुध्दीजीवी मंडळी प्रिंट मिडीयाला नेहमीच महत्व देत आहे .परंतु संपुर्ण महाराष्ट्रातील कोरोनाच्या संकट पार्श्वभूमीवर सर्व वृत्तपत्रांची वृत्तपत्रांची छपाई बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खात्री लायक माहीती मिळत आहे .

एक होलसेल वृत्तपत्र विक्रेते श्री.अनंता लाहोडकर यांच्या कहून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्तरावरील वृत्तपत्र विक्रेत्यांचे नेते श्री सुभाष देसाई यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या मुंबईतील वृत्तपत्र विक्रेता संघाच्या आदेशानुसार कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घरपोच वृत्तपत्र सेवा तसेच विक्री ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे . त्यामुळे बहुतांशी वृत्तपत्रांनी वृत्तपत्रांची छपाईसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे .
त्यामुळे वाचकांना आता वृत्तपत्र उपलब्द होणार नाही  वृत्तपत्रांची विक्री ३१ मार्चपर्यंत बंद रहाणार असल्याने या सर्व वृत्त पत्र विक्रेत्यांचे आर्थीक नुकसान होणार असून काहींची याच व्यवसायावर उपजिनीका असल्यामुळे अशा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटंबियांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचेही श्री लाहुडकर यांनी सांगितले .

एकूणच कोरोनाच्या निमित्ताने इलेट्रोनिक मिडीयाची चलती झालु असुन प्रत्येक चॅनल आपापला टीआरपी वाढवण्याच्या प्रयत्नात असतांना गडबडीत अनवधानाने राज्याचा मुख्यमंत्रीही बदलुन टाकण्यात असल्याची चुकीची बातमी हे चॅनल्स देऊ लागले आहेत.अशा चुकीच्या दिल्या जात असलेल्या बातम्या समाज माध्यमांवर ट्रोल होत आहेत .

अशातच संपुर्ण प्रिंन्ट मिडीयालाही कोरोना संकटाने ग्रासल्याचे वृत्तपत्र विक्री बंदच्या माध्यमातून उघड होत आहे .