Wednesday, June 3 2020 11:32 am

विवियाना मॉलमधील गुरुवारच्या छाप्यानंतर आज ईडीने घेतला १० कोटीचा मुद्देमाल ताब्यात

ठाणे : (प्रतिनिधी):पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी मागील गुरुवारी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलमधील “जिली” या डायमंड ज्वेलरी शोरूम आणि शॉपर्सस्टॉप मधील जिलीच्या काउंटरवर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी ईडीच्या पथकाने आक्षेपार्ह मुद्देमालाची मोजणी केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा ईडीच्या पथकाने सील मुद्देमाल ताब्यात घेतला.
पीएनबी घोटाळ्याचे सूत्रधार निरव मोदी यांनी देशातून पलायन केले. मात्र या बँक घोटाळ्याचा पैसा हा डायमंड व्यापारात गुंतवल्याने ईडीने देशभरात निरव मोदी यांच्याशी संलग्न डायमंड ज्वेलरी दुकानांवर छापेमारी केली. सोमवारी सकाळीच ईडीच्या पथकाने विवियाना मॉलमध्ये “जिली” या डायमंड ज्वेलरी दुकानातील आक्षेपार्ह मुद्देमाल सील करीत ताब्यात घेतला. सोमवारी सुट्टी असल्याने विवियन मॉलमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये ईडीच्या छाप्याने घाबराहटीचे वातावरण होते.