Friday, April 19 2019 11:49 pm

विवाहबाह्य संबंधात पुरूषांना दोषी धरणे चुकीचे : सुप्रिम कोर्ट

नवी दिल्ली :विवाहबाह्य संबंधात केवळ पुरुषांना शिक्षा देणं प्राथमिकदृष्टय़ा संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मिळालेल्या समानतेच्या तत्त्वाविरोधात आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. जोसेफ शाइन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा  यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला या खंडपीठाने हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यावर त्यांनीच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. ’संविधानाच्या अनुच्छेद 15 नुसार महिला आणि बालकांसाठी विशेष कायदा बनविण्याची परवानगी असल्यानेच 1954 मध्ये चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने कलम 497 ची वैधता कायम ठेवली होती,’ असं याचिकाकर्त्याचे वकील कलीश्वरम राज यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.