Sunday, July 5 2020 8:56 am

विरोधीपक्ष विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार

मुंबई : विधानसभचे अध्यक्ष हरिभाऊ बागड़े यांच्या विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडणार असून त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावे,अशी मागणी अजित पवार व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा न करता मतदान घेऊन अध्यक्षांनी घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही विरोधी पक्षाला चर्चा करायची होती तसेच फसवी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई,यासारखे अनेक प्रश्न विरोधी पक्षांना सभागृहात मांडायचे होते,मात्र सत्ताधारी अध्यक्षांनी जाणीवपूर्वक कामकाज बंद पाडले. १५ मिनिटांच्या तहकूबी नंतर सभागृह सुरु होताच विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या कथित ऑडियो क्लिपच्या मुद्यावरून गदरोळ झाला. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तसेच विधान परिषदेतील सभागृह नेते चंद्रकांत पाटील सदस्यांचा अंगावर धाऊन गेले, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रधान सचिवांना एक पत्रही दिले आहे आणि मंगळवारी सभागृहात विरोधी पक्ष अध्यक्ष हरिभाऊ बागड़े विरोधात अविश्स्वासचा ठराव मांडणार आहे .