Sunday, April 18 2021 10:21 pm

विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

मुंबई : विधानसभा अधिवेशनाचा आज (बुधवार,३ मार्च) तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे. कोकणातील शेतकऱ्यांना चक्रीवादळ आणि अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले या शेतकऱ्यांना सरकारने अल्प मदत केल्याने सरकाचा निषेध करण्यात आला.

ठाकरे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरी आंदोलनात सहभागी होते.

कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने अत्यल्प अशी मदत केल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध या आंदोलनात करण्यात आला आहे. कोकणातील उध्वस्त झालेसल्या शेतकऱ्यांसाठी एका मागे एक भूमिका घेतली परंतु मदत अत्यल्प मदत केल्यामुळे भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आंदोलन केले आहे.

विधिमंडळाच्या पायरीवर करण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशिष शेलार तसेच इतरही भाजप नेते आमदार उपस्थित होते. दरम्यान मंगळवारीही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडीत केल्याबद्दल भाजप नेते राम सातपुते यांनी आंदोलन केले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन भाजप नेत्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. तसेच विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज खंडीत न करण्याचे आदेश दिले आहेत.