Monday, January 27 2020 8:54 pm

विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद :  आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यात फुट पडल्यानंतर एमआयएमने विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.यामध्ये वडगाव शेरी,नांदेड उत्तर,आणि मालेगाव मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे.गणपती विसर्जन नंतर केव्हा हि आचारसंहिता लागू करून निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी ला लागले आहे. विधानसभा मध्ये सेना भाजपा मध्ये युती होणार असल्याने शिवसेना आणि भाजपातील जागा वाटपाची बोलणी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतलेल्या एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे.मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक आणि नांदेड उत्तर मधून मोहम्मद फिरोज खान ( लाला) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.