Wednesday, April 23 2025 1:26 am

विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

नागपूर, 08 : विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि मागील कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माजी विधानपरिषद उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते बबनराव दादाबा ढाकणे, माजी विधानपरिषद सदस्य किसनराव मक्काजी राठोड यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.