Sunday, April 18 2021 11:53 pm

विद्यार्थ्यांनी घेतले भूकंपा पासून वाचण्याचे थरारक धडे

पालघर :मागील दीड ते दोन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या भागात भूकंपाचे लहान-मोठे हादरे सुरूच असून यामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेखाली जगताहेत भुकंपा वेळी घेण्यात येण्याची काळजी आणि भूकंपानंतर घ्यावयाची काळजी यावर सध्या पालघर मधील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांतील हे चिमुकले विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक मार्फत धडे घेतात आणि त्यांना याचं प्रशिक्षण देत आहे आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ उल्हास केळकर मागील अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी आणि पालघर या तालुक्यांमध्ये भूकंपाच्या दरांचा सत्र सुरूच आहे आत्तापर्यंत सुमारे दोन हजार पेक्षाही जास्त लहान-मोठे हादरे या भागाला बसले असल्याची माहिती आहे यामुळे अनेक घरांना तडे गेले असून येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत डहाणू तलासरी पालघर हा आदिवासी बहुल भाग असल्याने येथील नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रशिक्षण येथील ग्रामीण भागातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते
       आग लागणे , भूकंप अथवा एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास उपलब्ध असलेल्या साधन सामग्री आपला स्वतःचा बचाव कसा करावा तसेच इतरांना इजा झाल्यास त्यांना तातडीने प्राथमिक मदत कशी करावी याची प्रात्यक्षिक येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत .ह्या उपक्रमाला  विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची क्षमता असल्याने हे विद्यार्थी सर्व प्रात्यक्षिक सहजरीत्या करत असल्याची माहिती उल्हास केळकर यांनी दिली त्याचप्रमाणे भूकंप हा कोणाचाही जीव घेत नसून आपण योग्य ती खबरदारी घ्यायलाच हवी असं आवाहन उल्हास केळकर केले आहे .
        सतत सुरू असलेल्या भूकंपाच्या दरामुळे नागरिकांसह आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रमशाळांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे मात्र या आपत्कालीन परिस्थितीत आपली आणि आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांची काळजी कशी घ्यायची यावर या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक मार्फत प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या मनातील भूकंपाविषयी भीती काहीशी कमी होताना पाहायला मिळत आहे .
        पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात भूकंपाच्या सावटाखाली जगणाऱ्या नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यास या आपत्ती व्यवस्थापन कडून सुरू असलेल्या प्रात्यक्षिकांचा मार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे नक्कीच मदत होईल असे मानले जात आहे .