ठाणे, 22 – देशातील मोठ्या सहकारी बँकांमध्ये सर्वोत्तम असलेली जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम गोपीनाथ पाटील व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमीटीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ बापू घरत यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष गोपीनाथजी (दादासाहेब) पाटील साहेबांनी आखून दिलेल्या निस्पृह जनसेवा सचोटी व पारदर्शकता या मार्गावरून बँकेने केलेली निरंतर वाटचाल स्पृहणीय (उल्लेखनीय) आहे.
24 एप्रिल 1972 रोजी नोंदणी झालेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेला 30 जानेवारी 1998 रोजी शेडयुल्ड दर्जा प्राप्त झाला. मार्च 2015 मध्ये बँकेच्या दैदिप्यमान प्रगतीमुळे मल्टी स्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झाला. बँकींग क्षेत्रामध्ये पारसिक बँकेचे नाव अग्रेसर आहे.
जीपी पारसिक सहकारी बँक मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक असून सध्या बँकेच्या महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक येथे एकूण 91 शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी रु. 4,395 कोटी, व कर्ज रु. 2,047 कोटी असून एकूण व्यवसाय रु. 6,443 कोटी इतका आहे.
जीपी पारसिक बँकेतर्फे डिजीटल बँकींग, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, यु.पी.आय, भारत बिल पेमेंट सिस्टिम (बी बी पी एस), रूपे डेबीड कार्ड, रुपे इंटरनॅशनल कार्ड, युपीआय द्वारे एटीएम कॅश विड्रॉवल, कॅश रिसायकल मशीन, ए.टी.एम ई-स्टेटमेंट इत्यादी सेवा प्रदान केल्या जातात.
जीपी पारसिक बँकेचे मावळते अध्यक्ष नारायण गावंड यांनी नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम गोपीनाथ पाटील व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमीटीचे अध्यक्ष केसरीनाथ बापू घरत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.